‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ शॉर्टफिल्मचे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यश

 शंकर मराठे  - मुंबई, २८ जानेवारी २०२१: ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ या शॉर्ट फिल्मची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मराठमोळ्या अभय ठाकुर यांनी दिग्दर्शित केलेल्या, मराठी कलाकारांच्या भूमिका असलेल्या या इंग्रजी शॉर्टफिल्मला विविध आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल मध्ये अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

वर्ल्ड फिल्म कार्निव्हल, सिंगापूर,  कोलकाता इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्डस, टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व सर्वोत्कृष्ट अभिनेता असे 3 पुरस्कार मिळाले आहेत. यूरोपियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल युके, मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, यूरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड अॅमस्टरडॅम, फेस्टिव्हल मध्ये ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ शॉर्टफिल्म फायनालिस्ट मध्ये पोहोचली आहे, तर उरूवती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, तामिळनाडू मध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट लेखन, यतीन कार्येकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि शंतनु मोघे यांना ज्यूरी स्पेशल अवॉर्ड अशा एकूण 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. L’Age d’Or International Arthouse Film Festival - Kolkata मध्ये सुद्धा ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ ला पुरस्कार मिळाला आहे. पोर्ट ब्लेयर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, सर्वोत्कृष्ट निर्मिती, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन,सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट थिलर शॉर्टफिल्म असे सहा पुरस्कार मिळाले आहेत. तसेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डस आणि ओनिरस फिल्म अवॉर्डस मॅनहॅटन,न्यूयॉर्क या ठिकाणी ‘इनिग्मा’ची निवड झाली आहे.

ड्रीम कॅचर मोशन पिक्चर कंपनी, स्नोफ्लेक स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ ची कथा,संवाद अर्जुन प्रधान यांची असून अभय ठाकूर आणि अजित ठाकूर यांचे पटकथा व संवाद मध्ये योगदान आहे. तर सिनेमॅटोग्राफी आशीष मेस्त्री यांची आहे. अतिशय वेगळ्या विषयावर भाष्य करणार्‍या या शॉर्टफिल्म मध्ये रुचिता जाधव, यतीन कार्येकर, अनन्या सेनगुप्ता, शंतनु मोघे, मीरा पाथरकर, रणजीत जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


या विषयी बोलताना निर्माता, दिग्दर्शक अभय ठाकूर म्हणाले, मी ड्रीम कॅचर या कंपनीच्या माध्यामातून मागील अनेक वर्षे व्हीज्युयल इफेक्ट्स क्षेत्रात कार्यरत आहे. प्रेक्षकांना काहीतरी हटके देण्याच्या हेतूने मी ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. ही 40 मिनिटांची एक सायकॉलॉजीकल थ्रिलर फिल्म असून यातून आम्ही मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य केले आहे. या शॉर्टफिल्मला मिळालेले पुरस्कार हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे यश आहे. स्नेहल ठाकुर, प्रसाध चव्हाण,अभिजीत कोकाटे यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी हे यश मिळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA