एमपॉवरतर्फे कोविड-19 साथीच्या काळातील मानसिक आरोग्याशी संबंधित चिंतांना संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीच्या भागीदारीतून 24x7 हेल्पलाइन सुरू

महाराष्ट्रातील नागरिकांना ‘बीएमसी-एमपॉवर वन ऑन वन’ या 1800-120-820050या क्रमांकावर उपलब्ध असलेल्या टोल-फ्री हेल्पलाइनवर अनुभवी मानसिक आरोग्य समुपदेशक मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये सेवा प्रदान करतील.

प्केविड-19 साथीचा भारतीयांच्या मानसिक आरोग्यावर फार मोठा विपरीत परिणाम झाला असून अनेकांना असुरक्षित, जोखमीच्या स्थितीत असल्यासारखे वाटू लागले असून त्यातून चिंता आणि तणाव यांच्यात वाढ झाली आहे. मानसिक आरोग्याविषयीच्या या चिंतांपासून मुक्ती देण्सयासाठी भारतीय मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या एमपॉवरने महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्यासोबत भागीदारी करून नागरिकांना 24x7 उपलब्ध असलेला आणि ‘बीएमसी-एमपॉवर वन ऑनऑनवन’ या नावाने ओळखला जाणारा 1800-120-820050 हा टोल-फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

महाराष्ट्रातील सर्व शहरांतील नागरिकांना मोफत उपलब्ध असलेल्या या हेल्पलाइनमध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित मानसिक आरोग्य समुपदेशकांचा समावेश आहे, हे सगळे एमपॉवर – द सेंटर, एमपॉवर- द फाऊंडेशन आणि एमपॉवर – द सेल येथील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट असून ते मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन आणि पाठबळ पुरवतील. या कठीण काळात महाराष्ट्रातील नागरिकांच्या मानसिक आरोग्यविषयक कोणत्याही प्रकारच्या चिंतांना संबोधित करण्यासाठी ही सेवा मराठी, हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध असेल. ‘बीएमसी-एमपॉवर वनऑनवन’ या हेल्पलाइनचा प्रसार करून या मोफत सेवेचा महाराष्ट्रातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि बीएमसी उपलब्ध पायाभूत सुविधा, संवादमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांचे व्यासपीठ यांच्या वापरातून या उपक्रमाला पाठबळ देणार आहेत.

“मानवजातीने आजवर कधीही ज्याचा सामना केला नव्हता किंवा ज्याची कल्पनाही केली नव्हती, अशा अभूतपूर्व पेचप्रसंगाला जग सामोरे जात असल्याचा हा काळ आहे. याच्या परिणामी प्रत्येकाला सुरक्षित राहण्यासाठी जबरदस्तीने घरात राहणे क्रमप्राप्त आहे. यामुळे अनेकांना कुटुंबाबरोबर काळ व्यतीत करून नाते दृढ करण्याची दुर्मीळ संधी मिळाली असली तरी जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य, आपल्या नोकऱ्या आणि मानवजातीचे एकंदर भवितव्य यामुळे लोकांमध्ये चिंता, निराशा आणि संतापाचेही वातावरण असेल.  यासाठी महाराष्ट्र सरकार अधिक उत्तम मानसिक आरोग्यासाठी श्रीमती नीरजा बिर्ला यांचे संपूर्ण पाठबळ लाभलेली आणि त्यांनी सुसज्ज केलेली हेल्पलाइन सुरू करत आहे. आमच्या प्रयत्नांमध्ये भविष्यकाळात सर्वांसाठी फार महत्त्वाची ठरणारी भर घातल्याबद्दल मी त्यांचा आणि एमपॉवरचा आभारी आहे.” असे श्री. आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार, महाराष्ट्र सरकार म्हणाले.



“कोविड-19 साथ आणि पाठोपाठ सरकारने जाहीर केलेला राष्ट्रीय लॉकडाऊन यामुळे मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते आहे. सामाजिक विलगीकरणामुळे लोकांच्या मनात हरवून गेल्याची भावना दाटू लागली असून इतरांपर्यंत कसे पोहोचावे, कसे व्यक्त व्हावे हे त्यांना कळेनासे झाले आहे. मानसिक आरोग्यसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विश्वासार्ह व्यासपीठ पुरवण्यासाठी आम्ही एमपॉवर या आघाडीच्या मानसिक आरोग्यसेवा पुरवठादारांबरोबर भागीदारी करून ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. या साथीच्या उद्रेकासोबत सुरू असलेल्या संयुक्त लढाईतून आपण अधिक ताकदवान बनून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, याला आमचे प्रोत्साहन राहील”, असे, श्री. प्रवीण परदेशी, महापालिका आयुक्त, मुंबई म्हणाले.

"आजवरच्या एका सर्वात मोठया आरोग्यविषयक संकटाचा जग सामना करत आहे, त्यात शारीरिक आरोग्य सर्वोच्च महत्त्वाचे आहे, मात्र, दीर्घकाळाचे विलगीकरण आणि अनिश्चिततेचे वातावरण यामुळे ढळणाऱ्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. या कसोटीच्या काळात चिंतित आणि तणावग्रस्त वाटणे स्वाभाविक आहे आणि आता आपण सजग असण्याची आणि आपल्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याची आजवर कधी नव्हती एवढी गरज आहे. बीएमसी-एमपॉवर वनऑनवन हेल्पलाइनच्या माध्यमातून मानसिक आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्याचा आणि ते महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आटोक्यात आणण्याचा आमचा उद्देश आहे. श्री. आदित्य ठाकरे (पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री), श्री. राजेश टोपे, (सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री), डॉ. संजय मुखर्जी (सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभाग), डॉ. प्रदीप कुमार व्यास (प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग) आणि श्री. प्रवीण परदेशी, महापालिका आयुक्त, मुंबई या महाराष्ट्र सरकारच्या मान्यवरांनी या उपक्रमाला दिलेले सक्रिय पाठबळ आणि सहकार्य यांबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या आव्हान

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA