भारत देशांतील सरकारी प्राथमिक शाळांची दुरावस्था दाखविणारा हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’

रेटींग – ३.५ 

भारत देशात सर्जिकल स्ट्राइक चे नाव घेताच सर्वसाधारण जनता लगेच जागृत होते. आता हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ द्वारे सरकारी एजुकेशन सिस्टम वर सर्जिकल स्ट्राइक होणार आहे आणि देशांतील जनता जागृत होणार आहे. ह्या सिनेमात रघुबीर यादव, अशोक सामर्थ, अखिलेन्द्र मिश्रा, पंकज झा, धर्मेंद्र सिंह आणि अलीस्मिता गोस्वामी ने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे तरुण बिष्ट ने आणि सिनेमाची निर्मिती केली आहे माइलस्टोन क्रिएशन्स व रतन श्री एंटरटेनमेंट चे नुपूर श्रीवास्तव, गिरीश तिवारी व आशुतोष सिंह रतन यांनी. हा सिनेमा १२ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. 

हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ मध्ये दाखविले आहे कि सरकारकडून हजारो कोटी रुपए प्राथमिक शिक्षण प्रणाली वर खर्च केले जातात, परंतु सरकारी शाळांची अवस्था काय आहे ? ही बाब तर सर्वांच्या समोर आहे. आपण दररोज वर्तमानपत्रात, टीवी न्यूज चैनल्स व इंटरनेट वर देशांतील शाळांची दूरावस्था बघतो. परंतु ह्या मागील कारण काय आहे कि सरकार इतका खर्च करुन देखील ह्या शांळाच्या गुणवत्तेत सुधार का होत नाही. ह्याच मुद्द्यावर सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आला आहे हिंदी चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’.

चित्रपट का बघावा – चित्रपटांची कथा काल्पनिक आहे, परंतु सत्यपरिस्थितीपासून दूर नाही आहे. ह्या सिनेमात प्राथमिक शिक्षण प्रणाली वरील प्रत्येक मुद्द्यांवर कटाक्षाने प्रकाश टाकण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला गेला आहे. हा सिनेमा मनोरंजना सोबत समाजाला एक महत्वपूर्ण संदेश देण्याचे सामाजिक कार्य करत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA