दिग्दर्शक गजेंद्र अहिरे घेऊन आले आजच्या माइक्रो फैमिली युगातील ‘सोहळा’

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक वेगवेगळ्या व नवनविन कथानकावर आधारित हटके सिनेमे देणारे नावाजलेले दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे. विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. या निमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगांवकर ह्या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटांविषयी माहिती देताना सांगितले कि चित्रपटांचे कथानक हे आजच्या माइक्रो फैमिली युगातील आहे. ह्यामध्ये नातेसंबंधातील झालेला बदल व एक वेगळेपण दाखविण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला आहे.

मराठी सिनेमा 'सोहळा' नव वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणारा कौटुंबिक व भावनाप्रधान असा मराठमोळ्या शैलीतला चित्रपट आहे. एवढचं काय तर ह्या चित्रपटांचे चित्रिकरण देखील रत्नागिरी सारख्या निसर्गरम्य परिसरात केले असून सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, शिल्पा तुळसकर, आस्मा खामकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी 'सोहळा'च्या निमित्ताने रसिक-प्रेक्षकांना पहायची संधी लाभणार आहे. मराठीच्या प्रेमाखातर के. सी. बोकाडिया यांनी आपल्या बैनर द्वारे म्हणजेच अरिहंत प्रॉडक्शन प्रस्तुत 'सोहळा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा निर्मित व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'सोहळा' ४ जानेवारी, २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA