महेश मांजरेकर बनले गडबडी बाबा

निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री एका नव्या-को-या मनोरंजक मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे व सध्या ह्या चित्रपटांचे चित्रिकरण मुंबईतील उपनगर गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील मंदिर लोकेशन वर जोमाने सुरु आहे. नुकतेच चित्रपटांचे निर्माते अमोल उतेकर यांनी चित्रपटांच्या शूटिंग रिपोर्ट कवरेज साठी मुंबईतील सिनेपत्रकार, टीव्ही चैनल्सला व डिजीटल मिडियाला आमंत्रित केले होते व त्यानुसार मोठ्या संख्येने मिडिया ने लोकेशन वर १५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता हजेरी लावली.
दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री ने फिल्मसिटी येथील मंदिरला चक्क आश्रमांचे स्वरुप दिले होते व त्या आश्रमात चक्क भक्तांची मोठी गर्दी झाली होती व आश्रम कलरफुल फुलांने सजविला होता. एवढंच काय तर आश्रमात एका मोठ्या सिंहासन वर गडबडी बाबा विराजमान झाले होते.
आश्रमांचा देखावा पाहून मनात लगेच प्रश्न आला कि आज कोणता सीन शूट करण्यात येणार आहे ? हा प्रश्न लगेच चित्रपटांचे निर्माते अमोल उतेकर यांना विचारला असता, ते उत्तरले कि आज ह्या ठिकाणी आश्रमांतील गडबडी बाबांचे चित्रिकरण होत आहे व त्यासाठी एवढी भव्य-दिव्य सजावट करण्यात आली आहे. गडबडी बाबा भक्तांच्या शंकाचे निवारण करतात व त्यांच्या समस्या एका क्षणात सोडवितात. गडबडी बाबाचा रोल मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील वरिष्ठ अभिनेता महेश मांजेरकर साकारत आहेत.
इतक्यात दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री ने एक्शन असा जोराने आवाज दिला व सर्व मिडिया तो शॉट शूट करण्यासाठी सज्ज झाले. आश्रमातील वातावरण इतकं भक्तिमय झालं होतं कि शूटिंग पाहणारे देखील भक्तिमय होऊन गेले होते, त्याचे कारण होते आश्रमाची भव्य-दिव्य अशी सजावट. गडबडी बाबांचा सर्व भक्तगण जोर-जोराने जयजयकार करत होते, व गडबडी बाबा आपल्या सिंहासनावर विराजमान होऊन भक्तगणांकडे पहात होते व त्यांची सेवा करण्यासाठी दासी देखील उपस्थित होत्या. पिवळ्या साडी मध्ये दासी गडबडी बाबांची उत्तम प्रकारे वारा घालत सेवा करत होत्या व गडबडी बाबा हवा खात-खात भक्तांकडे पहात होते. भक्तांचा जयजयकार झाल्यानंतर बाबांची आरती सुरु होते व सर्व भक्तगण मनोभावे बाबांची आरती ग्रहण व श्रवण करतात. त्यानंतर बाबांचा दरबार भरतो व बाबा आपल्या भक्तांच्या समस्या सोडवितात. हा सीन उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आला. दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री ने शॉट ओके म्हणल्यानंतर लंच ब्रेक करण्यात आला.
गडबडी बाबांचा रोल साकारणारे अभिनेता महेश मांजरेकर म्हणाले कि आतापर्यंत मी कोणत्याही सिनेमात अशा प्रकारचा रोल साकार केला नव्हता व बाबा बनण्याची माझी पहिलीच वेळ आहे. गडबडी बाबा ह्या चित्रपटांत कशा प्रकारचे कारनामे दाखविणार आहे, हे प्रेक्षकांना चित्रपटांत पहावयास मिळणार आहे.
चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री म्हणाले कि चित्रपटांची कथा कौटुंबिक पृष्ठभूमिवर आधारित असून ह्यामध्ये मनोरंजकाचा अविष्कार पहावयास मिळणार आहे, जी कॉमेडी चित्रपटांच्या कथानकानुसार घडत गेली आहे. आता हा कॉमेडीचा जलवा कशा प्रकारचा असेल त्यासाठी थोडासा धीर धरावा लागेल. जानेवारीच्या शेवट पर्यंत संपूर्ण चित्रिकरण्यात येणार आहे व एप्रिल महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

चित्रपटांतील मुख्य कलाकार महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, निथा शेट्टी, रानी अग्रवाल, संस्कृति बालगुडे व इतर आहेत. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA