पहिला मराठी चित्रपट इंडियन प्रेमाचा लफडा, ज्याची शूटिंग कच्छ स्थित रण मध्ये संपन्न झाली



मराठी चित्रपट नगरीत सध्या तर नव-नविन प्रयोग होत आहे. सलमान खान, रितेश देशमुख आणि अजय देवगन सारखे नावाजले सुप्रसिद्ध कलाकार मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे आणि काम देखील करत आहे. आता तर मोहनलाल पुरोहित आणि मुश्ताक अली ह्या जोडीने एमआरपी च्या बैनर खाली पहिला मराठी चित्रपट बनविला आहे, त्याचे नाव आहे इंडियन प्रेमाचा लफडा. आश्चर्याची बाब ही आहे कि मोहनलाल आणि मुश्ताक ही जोडी महाराष्ट्रीयन नाही आहे, परंतु सर्व काही महाराष्ट्रा मध्येच आहे म्हणूनच ह्या जोडीने मराठी चित्रपटाने फिल्मी दुनियेत पर्दापण केले आहे.

इंडियन प्रेमाचा लफडा हा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्याचे चित्रिकरण गुजरात स्थित रण मध्ये धूमधडाक्यात संपन्न झाले. आतापर्यंत हया ठिकाणी फक्त मोठ्या बैनरच्या हिंदी चित्रपटांचे शूटिंग होत होते. ह्या ठिकाणी चित्रपटाची नायिका मिस हेरिटेज शितल उपारे व हीरो स्वप्निल जोशी वर फुल सुंदरी... हे रोमांटिक गाणे चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे चे कोरियोग्राफर सुजीत आहे, त्यांनी यापूर्वी सुपरहिट हिंदी चित्रपट एक विलेन मधील तेरी गलियां... हे सुपरहिट गाणे केले आहे.

मराठी चित्रपट असून देखील निर्मात्या ने कोणतीही कमतरता ठेवली नाही. मोहनलाल आणि मुश्ताक ने सांगितले कि हे गाणे रोमांटिक असून अतिशन सुंदर प्रकारे चित्रित करण्यात आले आहे. आम्हांला विश्वास आहे कि हे गाणे सर्वांना फारच आवडेल.

चित्रपटांचे दिग्दर्शक दिपक कदम सांगतात कि इंडियन प्रेमाचा लफडा एका आगळ्या-वेगळ्या नात्यांची कथा आहे, त्या नात्याला काही नाव नसते. चित्रपटात इमोशन, प्रेम, अफेक्शन, ड्रामा व कॉमेडीचा भरपूर मसाला आहे, जो दर्शकांना नक्कीच पसंत पडेल.

चित्रपटातील मुख्य कलाकार शीतल उपारे, स्वप्निल जोशी ज्यूनियर, संतोष मयेकर, विजय पाटकर, विजय कदम, सिया पाटील, सुनील तावडे, ऊषा साटम, लेखा राणे आहेत. गायक आदर्श शिंदे, बेला शिंदे, मि, श्रुती राणे, स्वप्निल बांदोडकर, विक्रांत भारती व सुमधुर संगीत आशिष डोनाल्ड दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA