चंद्रकात कुलकर्णी म्हणतात हसवता हसवता अंतर्मुख करणारा परिपूर्ण चित्रपट ‘पिपाणी’-

मराठीत सध्या सिनेमाची संख्या वाढतेय पण या सिनेमांच्या संख्येबरोबर आम्ही ज्यांच्यासाठी सिनेमा बनवतो त्या प्रेक्षकांची तो चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची ओढ दिवसेंदिवस कमी होते आहे हि चिंतेची बाब आहे असे ‘पिपाणी’ या आगामी चित्रपटात पिपाणी भूमिकेत असलेल्या ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

चित्रपट लवकरात लवकर टीव्हीवर दिसणे, एका आठवड्याच्या आतच त्याचा व्यवसाय होणे या काही मर्यादा मराठी चित्रपट व्यवसायाला पडल्या आहेत,त्या खरतर तोडल्या पाहिजेत,त्यासाठी काही चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात पाहायलाच हवेत असे निर्माण होणे गरजेचे आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगेन कि पिपाणी हा त्या ताकदीचा चित्रपट आहे.

बाबुराव भोर निर्मित गजेंद्र आहिरे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीमूल्य उच्च आहेत, लेखन,संगीत,कलादिग्दर्शन,छायाचित्रण,दिग्दर्शन आणि कलावंतानी त्यांच्या आजवरच्या प्रतिमेला छेद देत उभ्या केलेल्या व्यक्तीरेखा यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने एक वेगळा सिनेमा आहे.


गजेंद्र आहिरे हा दिग्दर्शक आजवर समस्या प्रधान गोष्टी सातत्याने हाताळतो,इथेही त्याने शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळला आहे पण मांडणी ब्लॅक कॉमेडी पद्धतीची आहे.
हॉलीवु़ड चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणीला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने चित्रपट निर्मिती तिला करायची आहे.तिच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी ञानेश्वर टेंबरे ह्यांची नियुक्ती केली जाते. ही व्यक्तिरेखा मी वठवली आहे. त्याची त्या गावात झालेली बदली त्याचे त्या गावातले वास्तव्य आणि त्याला त्या दीड दोन वर्षात आलेले अनुभव त्याला जगणे शिकवून जातात.मुळचा शेतकरी असलेला हा सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या ओळखून असतो पण त्याचबरोबरीने सरकारी भूमिकाही त्यालाच वठवायची असते,त्याचे हे अनुभव प्रेक्षकांनी आवर्जून पाहावे असे आहेत.


गावातल्या पोपटरावच्या मदतीने जो मकरंद अनासपुरेने साकारला आहे तो या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी होतो. मकरंदने अफलातून अशी ही व्यक्तीरेखा रंगवली आहे. हा संपूर्ण सिनेमा त्या हॉलीवुडच्या दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडत जातो.

एक गंभीर समस्या मांडताना ती कुठेही बोजड होणार नाही हे या चित्रपटाच्या ब्लॅक कॉमेडीच्या शैलीमुळे शक्य झाले आहे आणि अगदी छोट्या भूमिकांसाठीही मोठ्या ताकदीच्या कलाकारांची फळी दिग्दर्शकाने वापरल्याने सिनेमात अनेक प्रकारच्या वल्ली पाहायला मिळतात. मकरंद अनासपूरे, चंद्रकांत कुलकर्णी, क्रांती रेडकर, वैभव मांगले, रवी काळे, हेमांगी कवी, रमेश देव, विकास समुद्रे अशी मात्तबर कलाकारांची मैफिल ह्या चित्रपटात आहे. या शिवाय जर्मन अभिनेत्री क्रिस्तीन हिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.


सिनेमाचे पोस्टर हे बरचसे बोलक आहे कारण या चित्रपटाची अर्कचित्रात्मक शैली ते अधोरेखित करते,वेगळ्या धाटणीचा करमणुकीबरोबरच विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे,त्यामुळे प्रेक्षक त्याला निश्चितच प्रतिसाद देतील असा विश्वास चंद्रकात कुलकर्णी ह्यांनी व्यक्त केला.

एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेलेलो असताना गजेंद्रने पिपाणीतली भूमिका तू करशील का अशी विचारणा केली. खरतर आम्ही मराठीतले काही दिग्दर्शक चर्चा करत होतो कि दिग्दर्शकांनीही परस्परांना एकमेकांच्या सिनेमात घ्यायला हवे, त्यामुळे एकमेकांबरोबर राहता येईल,परस्परांबरोबर संवाद वाढवता येईल. पण ह्या चर्चेला इतका पटकन प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते.

गजेंद्रचा एकांकिका लेखन ते चित्रपट दिग्दर्शक हा प्रवास पाहिला होता.त्याची काम करण्याची पद्धत ,या चित्रपटातल्या भूमिकेविषयी त्याने दिलेली विस्तृत कल्पना आणि त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा असलेली वेगळी शैली यामुळे हा चित्रपट मी स्वीकारला.


आपण स्वतः दिग्दर्शक आहोत हे विसरून दुसऱ्या दिग्दर्शकाचा नट असणे नेहमी चांगले असते.दिग्दर्शकां सोबत चर्चा करावी,समजून घ्यावे,वादावादी करावी पण त्याला काय म्हणायचे आहे तेच साकारावे कारण हा चित्रपट हा शेवटी दिग्दर्शकाच्या नजरेतून घडतो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA